युवा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
। नागोठण । वार्ताहर ।
नागोठणे मोहल्ल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर (उरण) येथील सुखःकर्ता निवासस्थानी हा प्रवेश सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस पक्ष आपल्या अडीअडचणीत सदैव आपल्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष महेंद्र रत यांनी यावेळी दिली.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पप्पुशेठ अधिकारी, राजू कुरेशी, नसीम इलामी, असिफ कुदेकर, असिफ मुल्ला, असिफ कुवारे, फैय्याज पानसरे, नजीरदादा सैयद, मुबशीर अधिकारी, असिफ कुवारे, ताबिश शेख, इरफान पानसरे, राजू घरटे, हनीफ पठाण, झुबेर पानसरे, सलमान पानसरे, आहद कडवेकर, सलमान शेख, फैसल सैयद, फैझान सैयद, साबीर पाटणकर, अम्मार पाटणकर, सगीर पानसरे, फहद गजगे, मूदसर चोगले, अरबाज फामे, अरबाज सैयद आदींचा समावेश आहे.