रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात त्रास

| खोपोली | प्रतिनिधी |

वन विभागाच्या परवानगीअभावी ताकई फाट्यावरून अष्टविनायकापैकी वरदविनायकाचे मंदिर असलेल्या महड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाने डांबरीकरण करू न दिल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात या खड्ड्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. महड गावातून ताकई फाट्यावर जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असून, तो पेण-खोपोली रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी एक्सप्रेसवरून किंवा अलिबाग येणारे भाविक येथूनच जातात. तसेच, पुंडलिकाच्या मंदिरातही दशक्रिया विधीसाठी दररोज लोक येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पादचाऱ्यांंना या रस्त्यावर चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अंदाजे अर्धा कि.मी.रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे अनेक वर्ष वाहनचालकांना असा प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version