मोहोपाड्यात वाहनचालकांची गैरसोय

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी परिसराचा केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहोपाडा शहरात वाढत असलेली वसाहत, नवीन झालेले कॉलेजेस, कार्यालये तसेच कारखानदारी व त्यांच्या वसाहती यामुळे मोहोपाडा शहराची लोकसंख्या वाढत चालली असून परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये वाढ झाली आहे.

बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहरात सायंकाळी नेहमीच ट्रॅफिक जाम होते. आसपासच्या गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी आले की, वाहन कोठे उभे करावे हा प्रश्‍न निर्माण होतो. त्यावेळी वाहनचालक मध्येच गाडी उभी करुन खरेदी अथवा इतर कामासाठी बाजारात जातात. अशावेळी एखादे वाहन आले तर त्या थांबलेल्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम होवून नागरिक व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. वाहनतळ झाल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल तसेच वाहतूक कोंडीही होणार नाही. काहीवेळा तर दुकानासमोरही वाहने दुचाकीस्वार लावतात त्याला या दुचाकीस्वारांना पर्याय नसल्यामुळेच ही वाहने कोठेही लावली जातात. त्यामुळे दुकानात ग्राहकाला जाणेही कठिण होते. वाहनचालक, ग्राहक व नागरिकांना होणारा त्रास शासनाने दूर करण्याच्या दृष्टीने मोहोपाडा शहरात एखाद्या ठिकाणी वाहन पार्किंग स्थळ तयार करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Exit mobile version