अपघातांच्या प्रमाणात वाढ

। अलिबाग । वार्ताहर ।
वाहन चालक वाहन चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिशय बेताल अशी वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सतत वाढ होताना दिसते. खालापूर टोलनाक्याच्या पाठीमागे 1 किलोमीटर अंतरावर मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर टँकर नं. एम.एच.04/के.यू. 5615 वरील आरोपी चालक याने टँकर भरधाव वेगात चालवून एक्स्प्रेसवेच्या सर्विस लेनमध्ये उभ्या असणार्‍या फिर्यादी रा.दळवाडी, गुजरात यांच्या ट्रक क्र. जी.जे.02/एक्स. एक्स. 9798 यास मागील बाजुने ठोकर मारून अपघात केला. हाळ खुर्द गावचे हद्दीत युकेज हॉटेल समोर मुंबई पुणे महामार्ग क्र. 4 वरील पुणे लेनवर आरोपी (वय-42 वर्षे) रा.लौजी, खोपोली याने त्याच्या ताब्यातील हिरो होंडा ग्लॅमर मोटार सायकल क्र. एम.एच.06/ए.एम.0015 ही जुन्या मुंबई पुणे महामार्गाने पनवेल बाजुकडून खोपोली बाजुकडे चालवित घेवून जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष चालविल्याने अपघात झाला . याबाबत सदरच्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version