नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मोदी सरकारने शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शेतकर्यांना दिलासा देत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, 1868 रुपये प्रतिक्विंटल भात आता 1940 प्रतिक्विंटल झाला आहे. यासह बाजरीवरील देखील एमएसपी वाढवण्यात आली. बाजरी प्रतिक्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला 300 रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तीळाला देण्यात आली. तिळाचे भाव 452 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले. कृषिमंत्री म्हणाले, गेल्या 7 वर्षात केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ज्यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल. एमएसपी 2018 पासून किंमतीवर 50% परतावा जोडून घोषित केले जाते. तोमर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गतवर्षीच्या तुलनेत भाताचा किमान आधारभूत दर 72 रुपये वाढून 1940 रुपयांवर आला आहे. मागील वर्षी ही रक्कम प्रति क्विंटल 1868 रुपये होती.