दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ

अलिबाग नगरपरिषदेचा निर्णय
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या आर्थिक संकल्पात केलेल्या तरतुदीनुसार 5 टक्के राखीव निधीतून, शहरातील दिव्यांगांना समान संधी प्राप्त करुन देण्यासाठी पालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या त्रैमासिक पेन्शनमध्ये वाढ करुन शहरातील दिव्यांगांना रक्कम रुपये 4,38,800/- (रु. चार लक्ष हजार आठशे मात्र) चा धनादेश सुपूर्द केला.

अलिबाग नगरपरिषदेमध्ये 102 दिव्यांग लाभार्थींची अद्यावत यादी तयार करुन, शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी रोजी शहरातील दिव्यांग लाभार्थीनी त्यांचे आयुष्यात मागे राहू नये, समाजाबरोबर त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. सन्मानाची वागणूक त्यांनाही मिळावी या विचाराने त्यांची प्रगती विचारात घेऊन त्यांना प्रतिमहा दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार 80 100 टक्क्यांकरिता रु. 2000/-, 60 ते 79 टक्क्यांकरिता रु. 1600/- तसेच 40 ते 59 टक्क्यांकरिता रु.1200/- प्रमाणे पेन्शन योजना कायम करण्यात आली आहे. शहरातील अद्यापपर्यंत नोंद केलेले 102 दिव्यांग लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार असून, अद्यापही नोंद न केलेले दिव्यांग लाभार्थी यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले नावाची नोंद केल्यास त्यांचा फायदा मिळू शकेल, असे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, दिव्यांग लाभार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version