रस्त्यावर अपघाताची भीती
| उरण | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्या अखत्यारीत असलेल्या कोप्रोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दरदिवशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठ मोठे दगड, ज्वलंतशील गॅस सिलिंडर ठेवल्याने प्रवाशी वाहनांना अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
जेएनपीए बंदरामुळे उरण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामांची संख्या बळावली असून, नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोप्रोली रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने त्याचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोप्रोली रस्त्याचे करोडो रुपये खर्च करून रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले. मात्र, व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठ मोठे दगड, ज्वलंतशील गॅस सिलिंडर ठेवल्याने प्रवासी वाहनांना अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कोप्रोली रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दरदिवशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. असे असताना या ठिकाणा वरील व्यावसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत ज्वलंतशील गॅस सिलिंडर तसेच वाहनांना अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठ मोठे दगड ठेवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.
दिपक पाटील,
माजी उपसरपंच पिरकोण






