रब्बी पिकांच्या हमीभाव किंमतीत वाढ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. यात गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलांच्या किंमतीत वाढ केली. गव्हाची एमआरपी40 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटर 2 हजार 15 रुपये इतकी केली आहे. इतर सर्व प्रमुख रब्बी पिकांच्या किंमतीतही वाढ केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या मध्ये 400 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची चडझ 5 हजार 50 रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. वनस्पती तेलाच्या उत्पादनात वाढीसाठी यामुळे मदत होणार आहे.
हरभरा आणि मसूरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून हरभर्‍याच्या दरात प्रति क्विंटल 130 रुपये तर मसूरच्या दरात 400 रुपये वाढ केली आहे. यामुळे हरभर्‍याची एमएसपी 5 हजार 230 रुपये तर मसूरची 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे.

Exit mobile version