ऑक्टोबर उष्म्यामुळे आजारात वाढ

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर महिलांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. मान्सून लवकरच परतल्यामुळे तापमानाचा पारा 35 अंशावर गेला असल्यामुळे ऑक्टोबर उष्म्या पूर्णपणे जाणवू लागली आहे यामुळे नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे आजारपणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने तालुक्यात चांगलाच घाम फोडला आहे. जिल्हा आधीच उष्णता असताना आता त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे तापमान 35 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. जिल्ह्यात आणखी काही दिवस ऑक्टोबर उष्म्याचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सध्या परतीचा पाऊस लवकर गेल्यामुळे तापमाणात वाढ झाली असुन यामुळे ताप, सर्दी, डोके दुखी यासारखे आजार पसरत आहेत.

रुग्ण संख्येत वाढ
दुपारी कडक उन्ह तर मध्यरात्रीच्या वेळेस हवेत गारवा पसरत असल्याने सध्या सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच या वातावरण बदलामुळे डासांची पैदास वाढू लागली आहे. वातावरण बदलामुळे रोगराईचे प्रमाण वाढले असून सायंकाळी डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नागरिकांकडून धुरीकरण, फवारणी करण्याची मागणी केली जात आहे.
Exit mobile version