| म्हसळा । वार्ताहर ।
कोकणात भातपिक तयार झाल्यावर अन्नाच्या शोधात सर्प, विंचू बाहेर पडत असतात. सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात म्हसळा तालुक्यांत विंचू-सर्प दशांचे घटनेत वाढ होत असताना दिसते. या दोन महिन्याच्या कालावधीत विंचू-सर्प आणि अन्य दंशाच्या 159 घटनांची नोंद तालुक्यातील ग्रामिण भागांत झाली असल्याचे तालुता आरोग्या आधिकारी डॉ. सागर काटे यानी सांगितले.
यामध्ये ग्रामिण रुग्णालयात सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत 76 घटना विंचू-सर्प आणि अन्य दंशाच्या आहेत. त्यामध्ये विंचू 32 , सर्पदंश 11 आणि कुत्रा दंश 27 घटना आहेत. तर मधमाशी, अन्य किटक, मांजर आणि उंदीर दंश घटना आहेत. ग्रामिण भागांतील प्रा.आ. केंद्र म्हसळा, मेंदडी, खामगाव, जिप दवाखाना पाभरे येथे 83 घटना विंचू-सर्प आणि अन्य दंशाच्या आहेत. त्यामध्ये विंचू 26, सर्प 14, कुत्रा 25 तर अन्य दंशाचे 18 घटना आहेत.