प्रभाग रचनेच्या बदलामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ

। पेण । वार्ताहर ।
राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका वगळता नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना निश्‍वीत करण्यात आल्यामुळे, पेण नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळण्याची इच्छा असलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
बहुसदस्यीय प्रभाग रचना निश्‍चितीमुळे, पेण नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या 21 वरून 24 झाली आहे. दरम्यान, पेण नगरपालिकेत कॉग्रेसकडे 9, नगरविकास आघाडीकडे 10, (राष्ट्रावादी 7, शेकाप 3) अपक्ष 2 असे 21 जणांचे बळाबळ आहे. तर काँग्रेसकडे 1 आणि शेकापकडे 1 असे स्वीकृत नगरसेवक आहेत. नगरपालिकेच्या कागदोपत्री जरी काँग्रेसकडे 9 नगरसेवक असले तरी ते नगरसेवक नावापुर्ते काँग्रेसचे मात्र ते भाजपचे आहेत. तर जे दोन अपक्ष नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस धारजीनी आहेत. येत्या निवडणुकीमध्ये पेणमध्ये भाजप मित्र पक्ष शोधत आहे. मात्र तो मित्रपक्ष शिवसेना असेल की, शेकाप हे येणारा काळच ठरवेल.
तर राष्ट्रवादी राज्यातील आघाडीचा फॉर्मुला पेणमध्ये वापणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वसर्वा खा. सुनिल तटकरे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकत्यांची ईच्छा नसताना देखील राष्ट्रवादी बरोबर घरोबा करावा लागेल. कॉग्रेसचे शहर प्रमुख आपल्याकडे 24 उमेदवारांची काँग्रेसची यादी असल्याचे सांगत सुटलेले आहेत. 21 चे 24 नगरसेवक झाल्याने राजकीय पक्ष्यांना जास्तीत जास्त जणांना संधी देणार असले, तरी युती आघाडयांमुळे अनेकांना आपले बळी दयावे लागेल हे सत्य आहे. भ एकंदरीत अनेक उमेदवार येत्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक दिसत आहेत.

Exit mobile version