आरोपी जयपालच्या पोलीस कोठडीत वाढ

| अलिबाग | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या जयपाल भनगोजी याच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला न्यायालयाने दोन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीनंतर त्याला न्यायालयात पुन्हा हजर केले असता, त्याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुचाकीवर बसवून चिमुकलीला गावापासून काही अंतरावर एका झोपडीजवळ नेले. तेथील झाडाच्या ठिकाणी तिच्यावर जयपालने अत्याचार केला. बुधवारी (दि.31) सायंकाळी साडेसातच्या ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या घटनेेनंतर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

Exit mobile version