भारतीय खेळाडूंच्या मानधनात वाढ

वन डे, टी-20 चाही लाखांतच आकडा

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारत आणि इंग्लंडची मालिका सुरू असताना एक गोष्ट समोर आली आहे. काही खेळाडू ठरवून कसोटी क्रिकेट खेळणे टाळत आहेत. आयपीएलमध्ये खेळाडू जीव ओतून खेळताना दिसतात. मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा किंवा इतर दुसर्‍या टूर्नामेंटकडे खेळाडू कानाडोळा करत आहेत. बीसीसीआय आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहे. आयपीएल खेळायची असेल तर त्याआधी देशांतर्गत क्रिकेटचे दोन सामने खेळायला हवेत. खेळाडू का टाळाटाळ करत आहेत माहित नाही.

बीसीसीआय कसोटी क्रिकेटमध्ये मानधन म्हणून प्रत्येकी एका सामन्याचे पंधरा लाख देतं. एक कसोटी सामना खेळल्यावर खेळाडू लखपती होत असतील तर अजून काय हवंय. पैशाचा विषय सोडला तर मग कसोटी क्रिकेट टाळाटाळ करण्याचं कोणतंही रास्त कारण दिसत नाही. आघाडीवर इशान किशन याचं नाव आहे. आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत निवड होऊनही त्याने वैयक्तिक कारण देत तो बाहेर पडला होता.

Exit mobile version