| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 23) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरपंच, उपसरपंचांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.