| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रातील विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. भाजप आम.गिरीश महाजन यांनी याबाबतची याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयानं गिरीश महाजन यांची याचिका फेटाळून लावली होती. गिरीश महाजन यांनी भरलेली 10 लाख रुपयांची अनामत रक्कम देखील जप्त करण्यात आली होती. आता गिरीश महाजन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारनं 9 मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याची तयारी केलेली होती. मात्र, राज्यपालांनी परवानगी दिलेली नाही. मुख्य न्यायाधीश रमण्णा यांच्यापुढे ही याचिका मांडण्यात यावी, अशी सूचना केली. नियमातील सुधारणा मनमानी आणि असंवैधानिक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.