| अलिबाग | वार्ताहर | कुरुळ येथे सोमवारी (दि.१४) संपन्न झालेल्या युवती उद्बोधन शिबिरात डिफेन्स अकॅडमी तर्फे महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले .
जागतिक महिला दिन आणि स्त्री क्रांतीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे 125 व्या स्मृतीवर्ष या दोन्हींचे संयुक्तिक औचित्य साधत नेहरू युवा केंद्र संघटन रायगड-अलिबाग जीवन ज्योती महिला ग्रामसंघ कुरुळ अलिबाग बहुद्देशीय संस्था रेवदंडा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डिफेन्स अकॅडमीने महिलांना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले . महिलांनी स्वसंरक्षण शिकणे फार गरजेचे आहे या हेतूने सदर आयोजित कार्यक्रमात डिफेन्स अकॅडमी ला मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यास आमंत्रित करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये डिफेन्स अकॅडमी चे संस्थापक समरेश शेळके व ट्रेनर अक्षय पाटील आणि अमिषा भगत यांच्याकडून स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन तथा प्रशिक्षण देण्यात आले .