रोह्यामध्ये भिकार्‍यांच्या संख्येत वाढ

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरात कोरोना निर्बंध शिथिल झाल्यापासून भिकार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत असून नगरपालिका, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांनी समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून या भिकार्‍यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या हाताला काम देण्याची गरज दिसून येत आहे.
रोहा शहरात आढळून येणार्‍या भिकार्‍यांमध्ये प्रामुख्याने महिला व लहान मुले यांचा वावर अधिक दिसून येत आहे.राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. भिक मागत फिरणार्‍या या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी नगरपालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असून भिक मागत शहरात फिरणार्‍या महिलांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शहरात लहान मोठ्या चोर्‍या होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version