राज्यसेवा परीक्षेसाठी 100 पदांची वाढ

। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या ङ्गराज्यसेवा परीक्षा 2021फसाठी 100 पदे वाढली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
4 ऑक्टोबर रोजी आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 290 पदांसाठी 2 जानेवारी 2022 रोजी पूर्व परीक्षा आणि 7 ते 9 मे 2022 दरम्यान मुख्य परीक्षा होणार असल्याचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राज्य सेवेतून भरल्या जाणार्‍या संवर्गातील पदांसह नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जाहिरातीमधील अटी, शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version