कामगारांच्या निवृत्तीवेतन योजनेत वाढ करा -मंत्री

मुंबई | प्रतिनिधी |
महागाईची झळ सर्व सामान्य प्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांना बसू लागली . सातत्याने होणार्‍या महागाईच्यां अपयशावर केंद्रातील मंत्रीगण काही बोलण्यास तयार नाही, अशी खंत भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण मंत्री यांनी लाखो कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने व्यक्त केली.
1995 ला सुरू झालेल्या निवृत्ती वेतन योजनेत वर्षानुवर्षे वाढ न झाल्याने ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. 2009 साली केंदाने निवृत्ती वेतन वाढ व्हावी म्हणून कोशियार समिती नेमली.समितीने किमान 3000/- रुपये अधिक महागाई भत्ता देण्याची शिफारस केली .मोदी सरकारने निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचे आश्‍वासंन दिले पण ते पाळले नाही. विरोधक सुद्धा या प्रश्‍नावर गप्प आहेत . ह्या वाढत्या महागाईच्या भडकाचां ज्येष्ठ नागरिक यांना चटका बसला असून 2022 मध्ये होणार्‍या महानगर पालिका , 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा , विधानसभा निवडणुकी मध्ये ज्येष्ठ नागरिक या अन्यायाला वाचा फोडतील असा इशारा गेली 26 वर्षे तुटपुंजी पेन्शन मिळणार्‍या सेवा निवृत्त जेष्ठ नागरिक यांच्या वतीने दिला आहे .

Exit mobile version