बोर्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत

15 ते 20 जणांना घेतला चावा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील बोर्ली नाका ते जुना बाजार भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत पंधरा ते वीस जणांना चावा घेतला असून, त्यातील काही जणांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

तालुक्यासह अनेक ठिकाणी तसेच समुद्र किनार्‍यावर विशेष करून सकाळच्या वेळेत भटक्या कुत्र्यांनी तीन जणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. रस्त्यावरील भटके कुत्रे पर्यटक व नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. याकडे शासनाच्या संबंधित तसेच ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत असून, योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.

मुरुडमध्ये श्‍वानदंश झाल्याच्या घटना ताज्या असतानाच बोर्लीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत पंधरा ते वीस जणांना चावा घेतला आहे. समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून, अजूनही वेळप्रसंगी कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्राणी मित्र संघटना, विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तसेच शासनाच्या आरोग्य खात्याने व संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायत यांनी यात लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांतून जोर धरीत आहे.

Exit mobile version