| आगरदांडा | वार्ताहर |
वविध विभागातील अनेक पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अधिक पंसती दिली स्वताची वाहने घेऊन बेसूमार गर्दीे आज जंजिरा किल्ला पहावयास मिळाली. राजपुरी व खोराबंदर येथे गाडया पार्क करुन जेट्टीवरुन शिडयांच्या होड्याव्दारे किल्लाकडे पर्यटकांना नेले जाते. पण सकाळपासूनच गर्दी होण्यास सुरु झाली.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी दिसत होती. एकांतपणा, निवांतपणा आणि पांढ-या शुभ्र वाळूवर फेसाळत येणारा सागरी लाटाचा किनारा मन नक्कीच मोहवते. मुरुड शहराला अडीच किलोमिटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा पर्यटकांचा खुणावत असतो या अंतरात कुठेही खडकाळ भाग लागत नाही त्यामुळे पर्यटकांना घोडागाडीतुन व मोटारबाईक वरून सहकुटुंब समुद्रकिनारी फिरण्याची अस्सल मजा लुटता येते. समुद्रकिनारी नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी असंख्य पर्यटक मुंबई, पुणे, ठाणे तर शहरातुन आणि जिल्हाच्या विविध भागातुन कुटुंबासह मोठया संख्येने समुद्रकिनारी दाखल झाले आहेत. काशीद-बीच, दत्तमंदिर, गांरबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत, रमणीय आहे.
गुलाबी थंडी अवतरली
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात थंडीचा कडाका वाढता असून गुलाबी थंडीचा मोसम अनुभवायला मिळत आहे. काशीद, मुरूड, नांदगाव, सर्वे, बारशिव समुद्रकिनारी पर्यटकांचे घोळके पहायला मिळत आहे.विशेषतः काशीद, मुरूड बीचवर पर्यटकांची उपस्थिती फार मोठी दिसून येत आहे. आलेले पर्यटक समुद्रात पोहण्याचा मनसोक्त लुटताना दिसत आहेत. मुरूड ते अलिबाग मार्गावर वाहनांच्या रांग असून नाताळ सण एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची हजेरी लावल्याचे लॉजिंग मालकांनी सांगितले. काशीद बीचवर देखील पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय आहे. मुरूड समुद्रकिनारी 3 किमी वाळूच्या किनार्यावर पर्यटकांची वर्दळ दिसून येत आहे. जोडून सुट्टी असल्याने रविवारी नाताळ दिनी देखील पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. मुरूड समुद्रकिनारी वाळूवरील पार्किंग फुल्ल झाले आहे. जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी चा पर्यटकांचा आणि शैक्षणिक सहलींचा ओघ कायम आहे.
समुद्रकिनारी व्हेज- नॉनव्हेज फेस्टिव्हल
मुरूड तालुका महिला मंच तर्फे 24 आणि 25 डिसेंबर रोजी मुरूड समुद्रकिनारी हिंदू बोर्डिंगच्या प्रांगणात आनंदमेळा अर्थात फूड फेस्टिव्हल चे आयोजन सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या मध्ये विविध शाकाहारी- मांसाहरी पदार्थांची, लज्जत चाखायला मिळणार आहे. या शिवाय सौंदर्य प्रसाधने, कपडे, ज्वेलरी आदी विविध प्रकारचे रोहा, मुरूड, अलिबाग येथील सुमारे 50 स्टॉल्स फेस्टिव्हल मध्ये लावण्यात आले आहेत. फूडफेस्टिव्हल मध्ये पर्यटकांनी आणि नासगरिकांनी भेट दयावी असे आवाहन आयोजक मुरूड तालुका महिला मंचने केले आहे.