माथेरानच्या ई-रिक्षाला वाढता प्रतिसाद

सकाळी 6 रात्री 10 पर्यंत सेवा उपलब्ध

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई-रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालविल्या जात आहेत. पाच डिसेंबर पासून या ई-रिक्षा पर्यटक आणि स्थानिक प्रवासी तसेच विद्यार्थी यांच्या सेवेत आहेत. मात्र रात्री सात वाजता बंद होणार्‍या ई-रिक्षा रात्री साडे दहा पर्यंत आता उपलब्ध असणार आहेत. ई-रिक्षा मधून करणारी प्रवासी पर्यटक यांची संख्या वाढत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी दिली आहे.

नगरपरिषद यांच्याकडून पाच डिसेंबर 2022 पासून सात ई-रिक्षा माथेरान मध्ये प्रायोगिक तत्वावर चालविल्या जात आहेत. तीन महिन्यांच्या या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांची पायपीट थांबविण्याचा प्रयत्न पालिकेने केला मध्ये प्राचार्य गव्हाणकर विद्यालय आणि सेंट झेव्हियर्स स्कूल यांच्या शालेय वेळेनुसार सर्व रिक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असतात. तर सकाळच्या वेळी स्थानिकांसाठी आणि दुपारपासून सर्व प्रवासी पर्यटक यांचयासाठी ई-रिक्षा यांची वाहतूक सुरु असते. सकाळच्या वेळी केवळ तीन ई-रिक्षा माथेरान मधील स्थानिकांसाठी उपलब्ध असतात, तर शनिवार रविवार वगळता या ई-रिक्षा सायंकाळी सात वाजता प्रवासासाठी बंद केल्या जातात. त्यामुळे उशिरा येणारे पर्यटक आणि स्थानिक यांना ई-रिक्षा यामधून प्रवास करायला मिळत नाही. तसेच रात्रीच्य वेळी अंधारात पायपीट करून शहरात यावे लागते.

आता शनिवार रविवार प्रमाणे दर दिवशी ई-रिक्षा रात्री साडे दहा पर्यंत चालविल्या जाणार आहेत. त्यात सकाळी सहा वाजल्यापासून ही वाहतूक सुरु होईल. परंतु रिक्षांची चार्जिंग आणि शाळेच्या वेळा या काळात रिक्षांची संख्या पर्यटक तसेच स्थानिक यांचयासाठी कमी असणार आहे. मात्र रात्री साडे दहा प्रयन्त वेळा वाढविण्यात आल्याने पर्यटन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रवाशांची पहिली पसंती
पाच डिसेंबर पासून सुरु झालेल्या ई-रिक्षा सुरु, आणि तेव्हापासून डिसेंबर महिन्यात तब्बल 15540 प्रवासी यांनी प्रवास केला. त्यातून पालिकेला 5 लाख 43 हजार रुपये महसूल गोळा झाला आहे. त्यात सर्वाधिक प्रवास हा 31 डिसेंबर रोजी तब्बल 1005 मतदारांनी प्रवास केला होता, तर जानेवारी महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी म्हणून पर्यटक आणि स्थानिक यांनी ई-रिक्षामधून प्रवास केला. महिन्यात ई-रिक्षा मधून 22258 प्रवासी यांनी प्रवास केला आहे. त्यात सर्वाधिक पर्यटक प्रवास हा 1 जानेवारी रोजी 1007 प्रवासी एवढी संख्या होती.

आम्ही माथेरान मधील पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्न करीत असून ई रिक्षा सायंकाळी आणखी जास्त वेळ सुरु ठेवावी अशी मागणी होती. त्यामुळे आम्ही शालेय विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय नाही याची काळजी घेऊन आता सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा या वेळेत ई-रिक्षा सुरु ठेवणार आहोत. या कालावधीत रिक्षा या चार्जिंग साठी थांबवाव्या लागतात ते लक्षात घेऊन रिक्षा उपलब्ध नसतील तर पालिका प्रशासनाला समजून घेण्याची आमची सूचना आहे.

सुरेखा भणगे, मुख्याधिकारी आणि प्रशासक
Exit mobile version