| पुणे | वृतसंस्था |
इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. अविनाश धनवे हा शनिवारी (दि.16) रात्री त्याच्या मित्रांसह इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्या डोक्यातही गोळी लागली. गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
गेल्या 5 वर्षात पुण्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांनी शिखर गाठलाय. देशभरातून लोक पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात स्थलांतर करत असतात. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या देखील प्रचंड वाढली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात पुण्यात बंदुक बाळगणाऱ्या लोकांच्य संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. विनापरवाना पिस्तूल वापरल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 461 पिस्तूलदेखील जप्त करण्यात आले होते.






