बेमुदत जेएनपीए चॅनेल बंद आंदोलन

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्हाधिकारी हे पुनर्वसन कायद्यानुसार शेवा कोळीवाडा संक्रमण शिबीर व्यवस्थापन करत नसल्याच्या निषेधार्थ विस्थापित महिला संघटना 2 ऑक्टोबरपासून जेएनपीएचे बेमुदत चॅनेल बंद आंदोलन करणार आहेत. शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन ही बाब समोर आली आहे. या आंदोलनमुळे शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचे अजूनही मागण्या मान्य न झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचे पुनर्वसन न झाल्याने व विविध मागण्या पूर्ण न झाल्याने आता राज्य व केंद्र शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

जिल्हाधिकारी रायगड यांनी 15 ऑगस्टच्या जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद आंदोलन मागे घेण्याबाबत 6 ऑगस्ट रोजी 21 मुद्यांवर बैठकीत निर्णय घेतले होते. त्याचे इतिवृत दीड महिना उलटून हि देत नाहीत. हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचे काम अद्याप सुरू असून पुनर्वसन पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. या गावातील रहिवाशांकरिता गावठाण घोषित नाही. तसेच, नमूना 8 वरील नोंदीत मालमत्ता धारकांडे घर /इमारतीचे शासकीय अभिलेख (सनद तथा 7/12) उपलब्ध नाहीत. म्हणून हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत बरखास्त केली असताना ती जिवंत ठेवन्याच्या निषेधार्थ 2 ऑक्टोबर पासून जेएनपीएचे चॅनेल बेमुदत बंद करणार असल्याचे शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने रविवारी (दि.14) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version