इंडिया आघाडीच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
| चणेरा | वार्ताहर |
चणेरा विभागातील न्हावे ग्रामपंचायतीमध्येनिवडणुकीचा रंग चढला आहे. शुक्रवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती. श्रीराम मंदिर सोनखार येथून शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. इंडिया आघाडीचेसरपंचपदाचेउमेदवार विकास भायतांडेल, सदस्यपदाचे उमेदवार निळकंठ कासकर, सुरेखा न्हावकर, पांडुरंग न्हावकर, विलास कासकर, गोपीनाथ गंभे, गणेश माठवी, संदेश विचारे, राज जोशी, शंकर दिवकर यांच्यासह विभागातील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्हावे गावात शेतकरी कामगार पक्षाने महिलांसाठी हळदी कुंकू ठेवले, सायकल वाटप केल्या, कोरोना काळात घराघरात सहकार्य केले, चष्मे वाटप केले, डोळ्यांचे ऑपरेशन केले, मुख्य रस्ता मंजूर केला, रुग्णवाहिका लोकार्पण केली. असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून जनतेची सेवा केली आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या. महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण त्यांना मुख्यमंत्री तसेच त्यांचे खासदार निवडून दिले पाहिजे. म्हणजेच आपण प्रामाणिकपणे इंडिया आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. न्हावे गावाच्या विकासासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध असेल. आघाडीचे उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून येतील असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.