इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात

आज 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट आघाडीच्या (I.N.D.I.A.) तिसऱ्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. हॉटेल ग्रँड हयात येथे सर्व नेते हजर झाले असून बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीकडून आज दुपारपर्यंत संयोजकाचे नाव जाहीर केले जाऊ शकते. बैठकसुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन करण्यात आले.

भाजपच्या विरोधात विरोधकांची वज्रमूठ अधिक बळकट  करणाऱ्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या अधिवेशनाला शुक्रवारी मुंबईत अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या बैठकीसाठी देशभरातून सुमारे अठ्ठावीस पक्षांचे प्रतिनिधी आले आहेत. शेतकरी कामगार पक्षातर्फे भाई जयंत पाटील यात सहभागी झाले आहेत. 

गुरुवारी रात्री या बैठकीसाठी जमलेल्या सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व नेत्यांच्यात अनौपचारिक चर्चा झाल्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हे नेते एकत्र आले. यावेळी त्यांचे खास फोटो शूटही करण्यात आले. 

त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीमधील चर्चेला प्रारंभ झाला. याच दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याच्या बातमी आल्याने कालपासून तर्कवितर्क चालू आहेत. हा इंडियाच्या एकजुटीचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

बैठकसुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे एकत्र फोटोसेशन
Exit mobile version