। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात 5G सेवा सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी 6G संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, सरकार या दशकाच्या अखेरीस 6G लाँच करण्याची तयारी करत आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनच्या ग्रँड फिनालेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली.
पीएम मोदी पुढं म्हणाले, ‘शेती आणि आरोग्य क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तरुण नवीन उपायांवर काम करू शकतात. आम्ही या दशकाच्या अखेरीस 6G लाँच करण्याची तयारी करत आहोत. सरकार गेमिंग आणि मनोरंजनामध्ये भारतीय उपायांना प्रोत्साहन देत आहे. सरकार ज्या पद्धतीनं गुंतवणूक करत आहे, त्याचा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा.’