भारत-बांगला महिला कसोटी बरोबरीत

। ढाका । वृृत्तसंस्था।

बांगलादेशकडून कधीही मालिका न गमाविणार्‍या भारतीय महिलांना प्रथमच त्यांच्यासोबत विजेतेपद विभागून घेण्याची वेळ आली आणि तीसुद्धा फलंदाजीत अंतिमक्षणी कच खाल्यामुळे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आजचा अखेरचा सामना 225 या धावसंख्येवर टाय झाला. भारतीयांनी अखेरच्या 34 धावांसाठी सहा फलंदाज गमावले आणि विजेतेपद मिळवण्याची संधी गमावली. भारत विजयी मार्गावर असताना पाऊस आला. त्यामुळे काही काळ सामना थांबला. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारत पुढे होता. परंतु नंतर खेळ सुरू झाला. पावसामुळे खेळ वाया गेल्यामुळे सुपर ओव्हर होऊ शकली नाही. या एकदिवसीय मालिकेत भारताची फलंदाजी चिंतेचा विषय होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. दुसर्‍या सामन्यात जेमिमाने भरपाई केली. त्यामुळे 1-1 बरोबरी झाली होती. आज 6 बाद 216 अशी वाटचाल केल्यानंतर अखेर 10 धावा करता आल्या नाहीत.

तत्पूर्वी, बांगलादेशने अधिक धावा करण्याऐवजी 50 षटके फलंदाजी करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांना 4 फलंदाज गमावताना 225 धावा करता आल्या. फरगाना हकने 107 धावा केल्या. परंतु त्यासाठी तिने 160 चेंडूंचा सामना केला. एकदिवसीय क्रिकेटमधील हे तिचे पहिले शतक होते. एरवी वर्चस्व राखणार्‍या भारतीय गोलंदाजांना आज चारच फलंदाज बाद करता आले.
अखेरच्या षटकांत भारताला विजयासाठी सहा चेंडूत 3 धावांची गरज होती. मेघना सिंग आणि जेमिमा यांनी प्रत्येकी एकेक धाव काढली. परंतु तिसर्‍या चेंडूवर मेघना यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाली. यासोबतच भारत आणि बांगलादेश यांच्यात ट्रॉफीही शेअर झाली.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : 50 षटकांत 4 बाद 225 (शमिमा सुलताना 52, फरगाना हक 107 – 160 चेंडू, 7 चौकार, निगर सुलताना 24, शोभना मोस्तारी नाबाद 23, स्नेह राणा 2-45, देविका वैद्य 1-42) बरोबरीत वि. भारत 49.3 षटकांत सर्वबाद 225 (स्मृती मानधना 59, शेफाली वर्मा 4. यास्तिक भाटिया 5. हरलिन देओल 77, हरमनप्रीत कौर 14, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 33, दीप्ती शर्मा 1. अमनज्योत कोर 10, सुलताना खातून 1-49, मारुफा अख्तर 2-55, नाहिदा अख्तर 3-37)

Exit mobile version