हॉकीत भारताकडून नेपाळचा धुव्वा

महिला संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यात दाखल


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दोन वेळच्या चॅम्पियन भारतीय महिला कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी नेपाळचा 61-17 असा पराभव करत सलग चौथ्यांदा महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या कामगिरीमुळे आता भारतीय महिला कबड्डी संघाने देशासाठी पदक निश्चित केले आहे.

पूजा हातवाला आणि पुष्पा राणा यांनी चढाईचे नेतृत्व करत पहिल्या सत्रापर्यंत भारताला 29-10 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यात भारताने नेपाळला पाच वेळा ऑलआऊट केले. रितू नेगीच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने नेपाळचा या विजय मिळवला. भारतीय महिला संघाने आतापर्यंत चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या झारखंडच्या अक्षिमानेही प्रभावी कामगिरी करत यशस्वी चढाई केली आणि दोन टच पॉइंटही मिळवले.

भारतीय रेडर्सना नऊ बोनस गुण मिळाले आणि बचावपटू पाचच बाद झाले. शनिवारी सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना इराण किंवा चायनीज तैपेईशी होईल. या दोन संघांपैकी एका संघाची निवड शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीतून होणार आहे.

Exit mobile version