दिल्लीत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी (दि.13) नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी लोकशाहीसाठी आम्ही सगळे एकत्र लढणार असल्याचे मत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. संविधानाचे रक्षण करणे हाच आमच्या आंदोलनाचा उद्देश असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या आहेत असे राहुल गांधी म्हणाले. आमची टीम आता थांबणार नाही. मतचोरीचा मुद्दा राजकीय नाही तर सर्वसामान्य जनतेचा आहे असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपविरोधात आम्ही सगळ्यांची एकजूट असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

जंतर मंतरवर आता लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यास दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी हे आर्किटेक्ट आहेत, तर अमित शाह आणि ज्ञानेश कुमार इम्प्लिमेंटर आहेत, असे गांधी म्हणाले. तुम्ही लोकशाही संपवू शकत नाही. तुम्ही काल जे पाहिलं ते फक्त पक्षाचे नाही तर सर्वसामान्यच्या भावना होत्या. हे सगळं भारतीयांसाठी सुरु आहे, देशाच्या भविष्यासाठी करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. काल मी पत्रकार परिषद मध्ये बोललो आम्ही थांबणार नाही, आज नाही तर उद्या ही टीम एन्ड गोलपर्यंत जाणार आहे. सगळं आम्ही आता सांगणार नाही. तुम्हाला सरप्राईज केलं जाणार आहे. आम्ही सगळे मिळून लढत राहणार आहोत. आम्ही न्यायलाय सरन्यायधीश यांचा आदर करतो ते त्यांचा रोल प्ले करतील असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडीया आघाडीचे नवी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version