दक्षिण अफ्रिकेवर भारताची मात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात एकदिवसीय सामना रंगला. हा सामना भारताने अवघ्या चार धावांनी जिंकला. पण या सामन्याची रंगत काही वेगळीच होती. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारेल हे काही सांगता येत नव्हते. अखेर भारताला विजय मिळाला. पण या सामन्यात बरेच विक्रम नोंदवले गेले.

भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात वनडे मालिका सुरु आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी चांगलेच झुंजवले. भारताने 3 गडी गमवून 325 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने 6 बाद 321 धावा केल्या आणि भारताने 4 धावांनी विजय मिळवला.

महिला वनडे क्रिकेटमध्ये चार शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी शतके झळकावली. तर दक्षिण अफ्रिकेकडून लॉरा वूलवर्थ आणि मारिजाने कॅपने शतक ठोकलं.

दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर उभी होती. 325 धावांचे टार्गेट सहज गाठेल असे वाटत होते. पण तसे झाले नाही. पण या सामन्यात जयपराजय झाला असला तरी काही विक्रम नोंदवले गेले आहेत. दोन्ही संघांनी मिळून 646 धावा केल्या आहेत. तर 4 शतके ठोकली आहेत. 
स्मृती मंधाना सलग दुसरे शतक
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध स्मृती मंधाना हीचे सलग दुसरे शतक आहे. स्मृती मंधानाने 120 चेंडूचा सामना केला. 18 चौकार आणि 2 षटकरांसह 136 धावा केल्या. 
स्मृतीचे 84 एकदिवसीय सामन्यातील हे 7 वे शतक
स्मृती मानधनाने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 103 चेंडूत तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. स्मृतीचे 84 एकदिवसीय सामन्यातील हे 7 वे शतक आहे. यादरम्यान तिने मिताली राजच्या 7 वनडे शतकांची बरोबरी केली. भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर होता. आता स्मृती मानधनाला मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मितालीला मागे सोडण्याची संधी असेल. यासह  तिने बॅक टू बॅक सामन्यात शतक ठोकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे.
हरमनप्रीत कौरनचा 171 धावांचा विक्रमी
कर्णधार हरमनप्रीत कौरनेही 88 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या. तसे तिसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 136 चेंडूत 171 धावांची विक्रमी भागीदारीही झाली. 
द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोहलवर्डने नाबाद 135 धावा 
भारताने विजयासाठी ठेवलेल्या 326 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोहलवर्डने नाबाद 135 धावा केल्या. पण विजयासाठी 4 धावा तोकड्या पडल्या. तिने आपल्या खेळीत 12 चौकार आणि तीन षटकार मारले. कर्णधार लॉरा वोहलवर्ड हीला मारिजने कॅपची साथ लाभली. तिने 94 चेंडूत 114 धावा केल्या. यात 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. कॅप बाद झाल्यानंतर टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवता आली.
Exit mobile version