गंभीरच्या संघात भारताला स्थान नाही

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याचा जागतिक एकादश संघ जाहीर केला आहे. नुकतेच दिनेश कार्तिकने त्याची ऑल टाईम टीम इंडिया जाहीर केली होती. त्यात महेंद्रसिंग धोनी, कपिल देव या विश्‍व विजेत्या कर्णधारांना स्थान मिळालेले नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले गेला. यात गंभीरच्या जागतिक एकादश संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंना स्थान मिळाल्याने सर्वांना आश्‍चर्य वाटले आहे.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या संघात प्रत्येकी 3 पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेचे 2 आणि श्रीलंका, वेस्ट इंडिज व इंग्लंडच्या प्रत्येकी 1 खेळाडूचा समावेश केला आहे. गंभीरने त्याच्या संघात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टचे नाव घेतले. यानंतर त्याच्या यादीत मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू सायमंड्स आहेत. यानंतर गंभीरने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक, अब्दुल रझाक आणि शोएब अख्तर यांची निवड केली. दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केल आणि एबी डिव्हिलियर्स यांना त्याने संघात स्थान दिले. तसेच, गंभीरने आपल्या संघात श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन, इंग्लंडचा अँड्र्यू फ्लिटाँफ आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा यांची निवड केली आहे.

Exit mobile version