| नवी दिल्ली | वार्ताहर |
इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या मोसमात धमाकेदार कामगिरी करणार्या युवा फलंदाज रिंकू सिंगचा बीसीसीआयने एकदिवसीय संघात समावेश केला आहे. देवधर ट्रॉफी-2023 या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेसाठी त्याला सेंट्रल झोन संघात स्थान देण्यात आले आहे. या संघाचे कर्णधारपद स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर सांभाळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रिंकू संघात नसला तरी तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल, अशी आशा आहे. रिंकू सिंगला 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी संधी मिळू शकते.







