मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले
गयाना, वृत्तसंस्था
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-0 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे संपन्न झाला. ही मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत होती. निर्णायक पाचव्या सामन्यात वेस्ट इंडीजने टीम इंडियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवत 3-2ने मालिका जिंकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली हा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. 2016नंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका गमावली आहे.
वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी20मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही टी20 मालिकाही 3-2 अशी खिशात घातली आहे. लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 9 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिज संघाने पहिले दोन टी-20 जिंकले. यानंतर टीम इंडियाने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी20 जिंकला. मात्र, पाचवी टी20 गमावण्याबरोबरच भारतीय संघाने मालिकाही गमावली. निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी वेस्ट इंडिजसाठी 107 धावांची भागीदारी करून भारताला सामना आणि मालिका जिंकण्यापासून दूर ठेवले. ब्रँडन किंग 55 चेंडूत 85 धावा करून नाबाद राहिला.