3 टी-20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार
। मुंबई । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयने टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले आहेत. श्रीलंकन संघाच्या भारत दौर्याची सुरुवात 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेने होईल, तर 4 मार्चपासून मोहालीमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. आधीच्या वेळापत्रकानुसार दोन्ही संघांमधील मालिका आधी 26 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांनी सुरू होणार होती, परंतु आता वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या दौर्याची सुरुवात टी-20 सामन्यांनी होत आहे. श्रीलंका क्रिकेटच्या विनंतीवरून टी-20 मालिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण श्रीलंका टी-20 संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे त्यामुळे संघाला एका बायो बबलमधून दुसर्या बायो बबलमध्ये जावे लागणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघालाही एक बायो बबल पार करावे लागणार आहे.
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर केले. याअंतर्गत 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे होणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील, जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
या मालिकेत भारत आणि श्रीलंकेचे संघ डे-नाईट कसोटीही खेळणार आहेत. ही कसोटी 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. अहमदाबादमध्ये ही कसोटी खेळली गेली आणि दोन दिवसांत सामना संपला. टीम इंडियाने पहिल्यांदा बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळली आणि जिंकली, तर ऑस्ट्रेलियात पराभव झाला.
मालिकेचे वेळापत्रक
24 फेब्रुवारी – पहिला ढ20 सामना, लखनौ
26 फेब्रुवारी – दुसरा ढ20 सामना, धर्मशाळा
27 फेब्रुवारी – तिसरा ढ20 सामना, धर्मशाळा
4-8 मार्च – पहिली कसोटी, मोहाली
मार्च 12-16 – दुसरी कसोटी, बेंगळुरू (डे-नाईट)