। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
19 वर्षांखालील विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना बुधवार 2 फेब्रुवारी रोजी अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. बांगलादेशचा पराभव करून भारताने तर पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताने विक्रमी 10 व्यांदा उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 7 वेळा सामना झाला आहे. यापैकी भारताने 5 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 2 सामने जिंकू शकला आहे. 2000 ते 2020 या दोन संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत पुन्हा भारताचे पारडे जड आहे.