भारत गुणतालिकेत अव्वल

| अहमदाबाद | वृत्तसंस्था |

भारताने विश्वचषक 2023 मधील आपला तिसरा सामना जिंकला. पाकिस्तानचा 7 गडी आणि 19.3 षटके राखून पराभव करत भारताने दणदणीत धावगती कमावली. याचा फायदा भारताला गुणतालिकेमध्ये झाला आहे. भारत आता तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताची धावगती +1.821 इतकी आहे. भारतासोबतच न्यूझीलंडचे देखील सहा गुण झाले आहेत. मात्र त्यांची धावगती +1.604 इतकी आहे.

या दोन संघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर आपले दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह दक्षिण आफ्रिका विराजमान आहे. मात्र पहिल्याच सामन्यात 428 धावा केल्याने त्यांचे नेट रनरेट हे +2.360 इतके तगडे आहे. त्यामुळे त्यांनी 17 तारखेचा नेदरलँडविरूद्धचा सामना जिंकला की ते पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर जातील. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर 3 पैकी 2 सामने जिंकणारा पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. मात्र त्यांचे नेट रनरेट हे -0.137 झाले असल्याने ते धोक्याच्या क्षेत्रात पोहचले आहेत.

Exit mobile version