भारत वि. इंग्लंडः टॉस जिंकत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

। लखनौ । वृत्तसंस्था ।

आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील २९वी मॅच भारत आणि इंग्लंड यांच्यात लखनौ येथे होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वच्या सर्व लढतीत विजय मिळवला आहे. दुसऱ्या बाजूला गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. 5 पैकी फक्त एका मॅचमध्ये त्यांना विजय मिळवता आलाय. या लढतीत विजय मिळून भारताला सेमीफायनलच्या दिशने आणखी एक दमदार पाऊल टाकण्याची संधी आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताची प्लेईंग 11
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी.
इंग्लंडची प्लेईंग 11
जॉनी बेयरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, मोइन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वूड.
Exit mobile version