| धर्मशाला | वृत्तसंस्था |
आज वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात मोठा सामना खेळला जात आहे. कारण हा सामना स्पर्धेतील अव्वल दोन संघांमधील आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेकीचा कौल भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या बाजूने लागला असून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे.
भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आलेले आहेत. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे उपलब्ध नाही. त्याशिवाय शार्दूल ठाकूर याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे. त्यांच्या बदली सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शामी यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. दोघेही यंदाच्या विश्वचषकात प्रथम मैदानात उतरणार आहेत.
भारताचे 11 शिलेदार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचे 11 शिलेदर डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
टीम इंडिया न्यूझीलंडकडून घेणार बदला? 2003 च्या विश्वचषकापासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर 2019 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने 2019 च्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.