। मुंबई । वृत्तसंस्था ।
अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर हे सियांग जिल्ह्यात कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे.
ब्रेकिंग! अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं
