भारतीय बॅडमिंटनपटू जिंकूनही पराभूत

सात्विक-चिराग जोडी ऑलिम्पिकमधून बाहेर
टोकियो | वृत्तसंस्था |
भारतीय खेळाडूंना यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हवी तशी कामगिरी करता येत नसून, बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग-सात्विक जोडी तर सामना जिंकूनही पुढच्या फेरीत जाऊ शकली नाही.
ग्रेट ब्रिटनच्या बेन लेन आणि सीन वँडी जोडीविरुद्ध भारताच्या चिराग आणि सात्विक जोडीने सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. पण, या विजयानंतरही ते क्वॉर्टर फायनलमध्ये पोहचू शकले नाहीत. याचे कारण, भारत असणार्‍या ग्रुपमधून दोनच संघ पुढील फेरीत जाणार होते. यावेळी तायवान आणि इंडोनेशिया पहिल्या दोन क्रमांकावर असून, भारत तिसर्‍या क्रमांकावर असल्यामुळे पुढच्या फेरीत जाऊ शकला नाही.
चिराग आणि सात्विकने ग्रेट ब्रिटेनच्या बेन लेन आणि सीन वँडीला 21-17 आणि 21-19 अशा सरळ सेट्समध्ये नमवत सामन्यात एक अप्रतिम विजय मिळवला. ब्रिटिश जोडीने दुसरा गेम जिंकण्यासाठी बरीच मेहनत घेतली; पण पहिल्या दोन सेट्समध्ये भारताने विजय मिळवल्याने सामना भारत विजयी झाला.

चिराग-सात्विकचे दुर्दैव
चिराग आणि सात्विक सामन्यात अप्रतिम विजय मिळवल्यानंतरही बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतील क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. याचे कारण भारत स्वत:च्या ग्रुपमध्ये तिसर्‍या क्रमांकावर होता. तर पहिल्या दोन जागांवर तायवान आणि इंडोनेशियाचा संघ होता. भारताला क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ग्रेट ब्रिटेनला मात देण आवश्यक होतं. ती कामगिरी भारताने केली देखील पण इंडोनेशिया संघाला देखील चीनी ताइपेविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक होते त्यानेच भारत पुढील फेरीत जाऊ शकला असता. पण इंडोनेशिया पराभूत झाल्याने भारत क्वॉर्टर फायनलचे तिकीट मिळवू शकला नाही.

Exit mobile version