कुडा लेणी येथे वर्षावास मालिका उत्साहात

| तळा | वार्ताहर |
भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण विभाग यांच्या वतीने व तालुका शाखा पोलादपूर, महाड, माणगाव, माणगाव शहर, तळा, रोहा, म्हसळा व श्रीवर्धन येथील बहुसंख्य उपासक, उपासिका यांच्या उपस्थितीत बुधवार, दि.13 रोजी बुद्ध लेणी कुडे येथे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने बुद्ध लेणीला मानवंदना देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गुणगौरव मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संस्कार विभाग उपाध्यक्ष अशोक काटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी, तर स्वागत सूत्रसंचालन आणि आभार तळा सरचिटणीस प्रकाश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास धम्मगुरु भन्ते प्रज्ञाज्योती, दक्षिण रायगड जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा व बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी व सभासद बंधू, भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version