सुरुवात फेल, विराट-पंड्याकडून सावरण्याचा प्रयत्न
। मुंबई । प्रतिनिधी ।
सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवासह अब्जावधी भारतीयांचे क्रिकेट विश्वचषकाचे स्वप्न भंगले आहे. इंग्लंडने भारताला पराभूत करून फायनलमध्ये मजल मारली. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडने 20 चेंडू राखून भारताचा पराभव केला. यात विराट कोहली (50) व हार्दिक पंड्याने (63) या जोडीने सर्वाधिक रन काढल्या. तर एकाही बॉलरला विकेट घेता न आली नाही. प्रत्येक मॅचमध्ये सर्वाधिक धावा काढून भारतीय संघाला सेमीफायनलपर्यंत पोहोचविण्यात विराट कोहली याचा मोलाचा वाटा होता.
भारताचा सेमी फायनलमध्ये लाजीरवाणा पराभव झाला. भारताला इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही. रोहित शर्माकडून यावेळी एक मोठी चूक घडली आणि त्याचा मोठा फटका यावेळी भारताला बसल्याचे पाहायला मिळाले. भारताने या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 168 धावा केल्या होत्या. भारताने चांगले आव्हान उभारले होते. पण भारताच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताच्या रोहित शर्माकडून यावेळी मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माने यावेळी सुरुवातीला अर्शदीप आणि भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी दिली खरी. पण त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी होत नसताना रोहितने फिरकी गोलंदाजांना संधी दिली. पण त्यावेळी जर रोहितने मोहम्मद शमीला गोलंदाजीला आणले असते तर नक्कीच सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर सेट झाले आणि त्यानंतर रोहितने शमीला गोलंदाजी दिली. ही मोठी चूक रोहितची यावेळी झाली. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये त्यांचा पराभव केला आणि त्यामुळेच भारताचे या विश्वचषकातील आव्हान संपले आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीवर प्रहार केला. त्यामुळेच भारताच्या हातून यावेळी सामना निसटला. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतक झळकावली, त्याचबरोबर शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला.
राहुल फलंदाजीला आला आणि त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण दुसर्याच षटकात राहुल बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. राहुलला यावेळी पाच चेंडूंमध्ये फक्त पाच धावाच करता आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल हा मोक्याच्या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. पण यावेळी चाहत्यांनी त्याच्यावर चांगलाच राग काढल्याचे पाहायला मिळत आहे. लोकेश राहुल महत्वाच्या सामन्यात आज अपयशी ठरला. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकं झळकावली होती. पण आजच्या मोक्याच्या क्षणी मात्र तो फ्लॉप ठरला.