| मुंबई | प्रतिनिधी |
बांगलादेशविरुद्ध महिला टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान प्रतिका रावलला दुखापत झाली होती. तिच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रविवारी होणारा हा सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला.रावलच्या उपांत्य फेरीत सहभागी होण्याबाबत शंका आहे. भारत आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि 30 ऑक्टोबर रोजी त्याच स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.
बांगलादेशच्या डावात 21 व्या षटकात प्रितिका रावल चेंडू पकडण्यासाठी धावली. पावसामुळे मैदान ओले होते, ज्यामुळे ती घसरून पडली. तिला स्ट्रेचरची आवश्यकता नव्हती, परंतु इतर खेळाडूंच्या मदतीने ती लंगडत मैदानाबाहेर पडली. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू प्रतीका रावलला क्षेत्ररक्षण करताना गुडघा आणि घोट्याला दुखापत झाली आहे. वैद्यकीय पथक तिच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.







