| पॅरिस | वृत्तसंस्था |
भारताची स्टार गोल्फपटू दिक्षा डागर हिच्या कारला अपघात झाला आहे. दिक्षाला यामध्ये कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. दिक्षाचा अपघात 30 जुलै रोजी संध्याकाळी झाला होता. हा अपघात झाला तेव्हा दीक्षाच्या कुटुंबातील 4 जण कारमध्ये प्रवास करत होते. कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, तिच्या शरीराला खरचटले आहे व आईच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत दिक्षा सहभाग घेण्याची अपेक्षा आहे. दिक्षा 7 ऑगस्टपासून खेळतान दिसणार आहे.






