। लिमा । वृत्तसंस्था ।
पेरूची राजधानी लिमा येथे सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्ड नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने 50 मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तरुण भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन फायनलमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित करून खडडऋ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तोमरने सोमवारी पात्रतेमध्ये 1185 गुण मिळवून कनिष्ठ विश्वविक्रमाची बरोबरी केली.
मंगळवारी भारताची सुवर्णमय सुरुवात; नेमबाज ऐश्वर्यचा रेकॉर्ड
