आशियाई खो-खो स्पर्धा: भारतीय संघाची घोषणा

मुंबई । प्रतिनिधी ।
आशियाई खो-खो स्पर्धा तामूलपूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी, आसाम येथे 23 मार्च पर्यत होत आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघाची घोषणा भारतीय खो-खो महासंघाचे सेक्रेटरी एम. त्यागी यांनी आज केली. भारतीय संघाच्या निवडीत महाराष्ट्राचे सरचिटणीस गोविंद शर्मा (निवड समिति सदस्य) यांनी विशेष भूमिका बजावली. तर या स्पर्धेसाठी खो-खोफेडरेशन ऑफ इंडियानच्या वतीने महाराष्ट्रातील डॉ. चंद्रजीत जाधव व सचिन गोडबोले यांची उपसमितीवर निवड करण्यात आली आहे.

पुरुष संघ : अमित पाटील, अक्षय गणपुले व अरुण गुणकी, अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे, अवधूत पाटील, एम. के. गौतम, ए. एस. एन. आगिरेड्डी , मदन , एस. संथरू , व्ही. कबिलन, सचिन भारगो, आकाश (उत्तर प्रदेश) व मुकेश (राजस्थान) राखीव : सुभम काची, सीबीन एम.व ध्रुव.

महिला संघ : प्रियंका इंगळे, गौरी शिंदे व अपेक्षा सुतार (सर्व महाराष्ट्र), निकिता पवार , परविन निशा , एल. मोनिका, बिन्दु, निर्मला भाटी, गुरवीर कौर , अर्चना माझी, दीपिका चौधरी , मीनू, रंजना, नसरीन व मधु राखीव : रीहका, मोनिका व रेश्मा राठोड.

Exit mobile version