भारतीय संघ आयर्लंडला रवाना

नव्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच ( 15 ऑगस्ट) मंगळवारी सकाळी आयर्लंडला रवाना झाला. तेथे आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अनेक खेळाडूंसाठी ही एक महत्त्वाची मालिका असेल पण सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. तब्बल दीड वर्षानंतर जसप्रीत बुमराह राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघापासून दूर होता. भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी सकाळी संघ आयर्लंडला रवाना झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. भारतीय क्रिकेटपटूंचे हसरे चेहरे हे दाखवतात की खेळाडू चांगल्या स्थितीत दिसत होते.

वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका गमावल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी दोन हात करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेत संघाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह या संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शाहबाद अहमद, शिवम दुबे आणि जितेश शर्मा या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या टी-20 मालिकेसाठी रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने खुद्द याबाबतचे ट्वीट शेअर केले आहे आणि पोस्टच्या खाली हम आ गये. हे शीर्षक दिले आहे.

Exit mobile version