महिला भारतीय संघाची हारकीरी सुरुच

| ऑस्ट्रेलिया | वृत्तसंस्था |

दौर्‍यावर असलेल्या महिला भारतीय संघाची हारकीरी सुरुच आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची मालिका 0-3 अशा फरकाने गमावली. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात विजय मिळवून कमबॅक करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता. मात्र भारतीय संघाची हारकीरी सुरुच आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 18 बॉल राखून पूर्ण केलं. कांगारुंनी 47 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 47 ओव्हरमध्ये 250 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.केटी मॅक ही ऑस्ट्रेलियाच्या विजयाची नायिका ठरली. केटी मॅक हीने 126 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. कॅप्टन ताहलिया मॅकग्रा हीने 61 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. तर मॅडी डार्क आणि चार्ली नॉट या दोघींनी प्रत्येकी 27 आणि 26 अशा धावा केल्या. तर टेस फ्लिटाँफ हीने 5 धावांचं योगदान दिलं. तर निकोल फाल्टम आणि केट पीटरसन या दोघींनी 1-1 धाव केली. तर भारतीय संघाकडून मेघना सिंह आणि मिन्नू मणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाची बॅटिंगदरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारतीय संघाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 249 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघासाठी राघवी बिस्त हीने सर्वाधिक धावा केल्या. राघवीने 102 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 82 रन्स केल्या. तेजल हसबनीस हीने 67 चेंडूत 53 धावांची खेळी केली. कॅप्टन मिन्नू मणी हीने 27, शिप्रा गिरी 25 आणि शुभा सतिशने 16 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी मॅटलान ब्राउन हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर निकोला हॅनकॉक आणि रेस पार्सन्स या दोघींनी 2-2 विकेट्स घेतल्या.

Exit mobile version