ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धूळ
टोक्यो | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रविवारी झालेल्या ग्रुप मॅचमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया संघाने 7-1 च्या फरकाने धूळ चारली. सामन्यातील दुसर्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पाडलेल्या गोल्सच्या पावसात भारताच्या विजयाच्या आशा वाहून गेल्या.
सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तिसर्या क्वॉर्टरमध्ये एक गोल झळकावत भारतीय संघाने सामन्यात परत येण्याचा प्रयत्नदेखील केला; पण ऑस्ट्रेलिया संघाने हा प्रयत्न नाकाम करवला.21 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने सलग दोन पेनल्टी कॉर्नर्सच्या मदतीने गोल केले. त्यानंतर 5 मिनिटांतच ऑस्ट्रेलियाने 23 आणि 26 व्या मिनिटाला गोल करत 4-0 ची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने इतकी आघाडी घेतल्यामुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करणे अवघड झाले. तरीदेखील 34 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीने दिलप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने एकही भारताला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. पुढील 26 मिनिटाचत 3 गोल ठोकत ऑस्ट्रेलियाने सामन्यात 7-1 दणदणीत विजय मिळवला. आता पूल ‘ए’ मध्ये भारताचा सामना 27 जुलैला स्पेनसोबत होणार आहे.